img

नवीन घर घेण्यापूर्वी या मूलभूत बाबींसह अपडेट रहा...

इच्छित स्थळी अत्याधुनिक सुविधांसह स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. काही वर्षांपूर्वी घर शोधणे खूपच जिकरीचे काम असायचे कारण स्वतः ऑफिस किंवा व्यवसायावरून आल्यानंतर उर्वरित वेळेत घर शोधावे लागत असे. यामध्ये आठवड्यातील निवांतपणे घालवायची सुट्टी सुद्धा अपुरी पडायची. घर घेतानी मध्यस्थी असायचे जे आपल्याला अपेक्षित साईट दाखवायचे यामध्ये कधी-कधी फसवणूक सुधा व्हायची.

आज काळासोबत तंत्रज्ञानाची साधने आली आणि मानवी जीवन खूपच सुकर बनले. आज आपण घर बसल्या आपल्याला हवे तिथे आणि हवे तसे घर शोधू शकतो ते पण एका क्लिकवर. खात्री न करता अनेकजण घरामध्ये पैसा गुंतवतात नि पदरी निराशा पाडून घेतात. म्हणूनच आपण जी गुंतवणूक करणार आहोत, तिचे विश्लेषण करणे खूप आवश्यक असते. हे विश्लेषण करताना किंमत, ठिकाण आणि कुटुंबानुसार आकार या तीन घटकांचा प्रामुख्याने विचार करावा, कारण आपण राहण्यासाठी घर घेणार आहोत आणि आपली साधाहरणपने एक पिढी तिथे राहणार असेल किंवा आपण जी गुंतवणूक करीत आहोत त्यातून भविष्यात चांगला परतावा मिळावा व ती चांगली असावी अशी आपली नेहमीच अपेक्षा असते. यासाठी आपला नेमका उद्देश, भांडवल आणि जोखीम लक्षात घेऊन गुंतवणुकीचे विश्लेषण करावे.

घर घेण्याची दोन महत्वाचे उद्देश असतात. आपण एका उच्च जीवनशैलीची आवड म्हणून राहण्यासाठी घर घेणार आहोत, की फक्त एक गुंतवणूक म्हणून घर घेणार आहोत, हे ठरवूनच आपण गुंतवणूक करावी. या सर्व गोष्टीतून विचारपूर्वक निर्णय घेऊन जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा गुंतवणूक करणे अधिक सोयीचे होते. गुंतवणूक करताना ठिकाण हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतो, त्यामुळेच त्याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. कारण आपण जर गुंतवणुकीच्या उद्देशाने आज आपण जी गुंतवणूक करतोय ती भविष्यात विकणार असतांनी तिच्यापासून किती लाभ होईल, तसेच व्यावसायिक मूल्याबरोबर त्या जागेचे सामाजिक मूल्यदेखील कितपत महत्त्वाचे आहे, हे बघणे आवश्यक असते.

घर घेतानी आप-आपल्या परीने काही गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. काही लोकांना शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात घर असणे अपेक्षित असते ज्यातून त्यांना निवांत क्षणांचा आनंद घेता येईल. याउलट काही लोकांना शहर वस्तीत म्हणजे जिथे शाळा, कॉलेज, बँका, रुग्णालय, बाजारपेठ इ. सोयीसुविधा आपल्या घराजवळ असणे अपेक्षित असते. जेणेकरून त्यांना दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल.

भविष्यात घर विकायचे झाल्यास त्या घराचा योग्य परतावा मिळायला हवा, या गोष्टींचा सारासार विचार करून करीत असलेली घराची गुंतवणूक ही नेहमीच फायदा देणारी असावी.

तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागार निवड-

रिअल इस्टेट सल्लागार निवड करतानी त्याला जागेविषयी व इतर कायदेशीर बाबींविषयी योग्य माहिती आहे ना हे जाणून घेतल्यानंतरच करावी. एखादी जागेत गुंतवणूक करावी कि नाही या विषयी योग्य मार्गदर्शन केल्याने गुंतवणूक करताना निर्णय घेणे सोयीस्कर होते.

गुंतवणूकमध्ये नेहमीच जोखीम असते असा समज आहे, कारण त्यामध्ये सुरक्षेच्या हमीपेक्षा फसवणूक अधिक असते असे आपण नेहमी ऐकत असतो. याबरोबर आर्थिक धोरणांतील चढउतारांचा देखील यावर परिणाम होत असतो. परंतु आपण विश्वसनीय डेव्हलपर्स सोबत गुंतवणूक केलेली असेल तर, ती कधीच धोक्याची नसते.

आपत्तीमुळे देखील गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. सध्या जगभरात थैमान घातलेल्या महामारीचा सर्वच क्षेत्रांवर कमी जास्त परिणाम दिसून येत आहे. रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रावर सुद्धा काही प्रमाणात का होईना त्याचा परिणाम झालेला आहे. परंतु रिअल इस्टेट कंपनीचे व्यवहार विश्वसनीय आणि पारदर्शक असेल तर कुठल्याही परिस्थितीत आपले नुकसान न होण्याची शाश्वती असते. म्हणूनच डेव्हलपर्स कंपनीची निवड करतांना सर्व गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक असते.