gudhi-padwa

औरंगाबादमध्ये प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी 'या' ५ गोष्टी ठरतील अधिक फायदेशीर !

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. आपल्या औरंगाबादमध्येही मोठा लाभ मिळवून देणारे गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. रोजगार, शिक्षणाच्या संधींमुळे शहराचा वेगाने विस्तार होताना आपण पाहतो आहे. आपलंही औरंगाबाद शहरात सुंदर घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी बजेट व सोयीनुसार प्लॉट, फ्लॅट तसेच स्वतंत्र घर अशा प्रॉपर्टीसाठी सर्वच प्रयत्नशील असतात. त्यामुळे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगले रिटर्न्स मिळण्याला इथे उत्तम वाव आहे.

औरंगाबाद शहरात प्रॉपर्टीमध्येप गुंतवणूक करून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू इच्छित असाल, तर प्रॉपर्टी खरेदी करताना या महत्वपूर्ण गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे.

लोकेशन

प्रॉपर्टीचं लोकेशन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रॉपर्टीचं लोकेशनचं तीचं मूल्य निर्धारित करत असतं. विशिष्ट कालावधीत उत्तम परतावा मिळवण्याच्या हेतूने तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नव्याने विकसित होत असलेल्या भागातल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. जेणेकरून कमी गुंतवणुकीत तुम्हाला अधिक प्रॉपर्टी खरेदीचे पर्याय उपलब्ध होतील

सोयीसुविधा

आजूबाजूच्या परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रस्ते यांसारख्या मुलभूत सोयी-सुविधा असलेल्या प्रॉपर्टीला उत्तम किंमत मिळते. प्रॉपर्टी खरेदी करताना सामान्यपणे ग्राहक या बाबींना प्राधान्य देतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर नेहमी याप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत का, हे अवश्य पाहा. या सुविधा नियोजित किंवा निर्माणाधीन असेल, तर अशा लोकेशनवर सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. कोणतीही खरेदी करतेवेळी प्रॉपर्टी भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकेल, याची खात्री करा!

कनेक्टिव्हिटी व वाहतूक सुविधा

प्रॉपर्टी खरेदी करतेवेळी खरेदीदार ग्राहक सार्वजनिक वाहतुकीची सुविधा व उत्तम कनेक्टिव्हिटीलाही प्राधान्य देतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतेवेळी ही बाबही अवश्य लक्षात घ्या. वाहतूक व्यवस्थेचे ग्राहकांचा प्रॉपर्टी खरेदीकडे कल वाढविण्यास व अधिक पटीने रिटर्न्स देण्याच्या दृष्टीने खूप महत्व असते. गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टी शोधत असाल, तर शहरातील प्रमुख स्थळांशी, बसस्टॅन्ड, रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्टला उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या पर्यायांना प्राधान्य द्या !

प्रॉपर्टी भाडेतत्वावर देण्याचा पर्याय

प्लॉट, फ्लॅट तसेच स्वतंत्र घर अशा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक दुहेरी लाभ देणारी ठरते. प्रॉपर्टी मूल्यात हळूहळू वाढ होत असताना, या प्रॉपर्टीतून नियमित उत्पन्न देखील येऊ शकते. भाड्यातून मिळणाऱ्या रकमेतून प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च आणि कर इ. भरता येतात. एमआयडीसी परिसर, कमर्शिअल हब, कॉर्पोरेट ऑफिसेसजवळील गुंतवणूक केलेल्या प्रॉपटीतून भविष्यात चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

उच्च रिटर्न्स (ROI)

गुंतवणूक करताना ही बाबही लक्षात घ्यायला हवी की, तुम्ही गुंतवणूक किती काळासाठी करू इच्छिता. प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक ही चांगला परतावा अपेक्षित असल्यास, दिर्घकाळासाठी निर्धारित करणे आवश्यक असते. अपवादात्मक स्थितीत एखादी प्रॉपर्टी कमी काळात अधिक लाभ देऊन जाते. यासाठी प्रॉपर्टी निवड हा घटक महत्वपूर्ण ठरतो.

प्रॉपर्टीचे व्यवहार करताना विश्वासाहर्ता महत्वपूर्ण असते, अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. औरंगाबाद बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे 'आर्च डेव्हलपर्स'. या समूहाने औरंगाबाद शहर व परिसरात अनेक कुटुंबीयांचे गृहस्वप्न पूर्णत्वास आणले आहे. फ्लॅट, रो-हाउसेस, शॉप्स, ऑफिसेससह शहराच्या विविध लोकेशनवर गुंतवणुकीसाठी बजेटमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 'आर्च डेव्हलपर्स' सोबत केलेल्या गुंतवणुकीतून अनेकांनी मोठा फायदा मिळवला आहे.
प्रॉपर्टीसंबंधित अधिक माहितीसाठी आजच आम्हाला
संपर्क करा

ऑफिसचा पत्ता:
सिटी प्राईड, मोंढा नाका, जालना रोड, औरंगाबाद.
ऑफिस फोन नं: +91 72640 00777