
घर खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्ताचे महत्व
हिंदू दिनदर्शीकेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घर खरेदी करणे तसेच नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणे यासारख्या महत्त्वाच्या कार्यांचा विचार केला जातो.
प्रत्येक सणाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते. कार्याच्या शुभारंभ प्रसंगी हा उत्तम काळ मानला जातो. घर खरेदीदार, तसेच रियल इस्टेट डेव्हलपर्स नवीन काही सुरू करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी शुभतिथी पाहतात. शुभमुहूर्तावर ग्राहक सणासुदीच्या ऑफर आणि योजना शोधत असतात. या काळात प्रॉपर्टी खरेदीकडे अधिक कल असल्याने डेव्हलपर्ससुद्धा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व निवासी प्रकल्प लॉंच करतात.
शुभ तारखांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य असते असे मानले जाते आणि म्हणूनच या तारखांवर वास्तुपूजा किंवा गृहप्रवेश विधी केले जातात. अक्षय्य तृतीया हा असाच एक शुभ दिवस आहे, जो प्रॉपर्टीसंबंधित व्यवहार करण्यासाठी किंवा मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी, गृहप्रवेश करण्यासाठी एक आदर्श दिवस मानला जातो. 'संस्कृतमध्ये अक्षय म्हणजे, कधीही कमी न होणारे, जे शाश्वत असत'. हा दिवस अधिक शुभ आणि यश मिळवून देणारा मानला जातो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते अक्षय्य तृतीयेला प्रॉपर्टी खरेदीमागील कारण म्हणजे या दिवशी नवीन उपक्रमांची सुरुवात किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केली तर समृद्धीत वृद्धी होते आणि ती भाग्याची ठरते.
घर खरेदी हा वर्षांनूवर्षांपासून प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. मनासारख्या घरासोबतच लोकेशन तसेच सोयीसुविधा या बाबींनाही आता प्राधान्य देण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा तसेच आरामदायी जीवनशैली इ. कारणांनी मोठ्या शहरांना महत्व प्राप्त झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये औरंगाबाद शहराची सुद्धा गणना केली जाते. औरंगाबाद शहर व परिसर वेगाने विकसित होत असून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय याकडे आकर्षित होत आहे. त्यांच्या सुनियोजित निवासी गरजेसाठी अनेक रियल इस्टेट समूह विविध पर्याय बहाल करीत आहेत. या समुहांमध्ये 'आर्च डेव्हलपर्स' हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
आर्च ग्रुप अनेक वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात विश्वसनीय सेवा पुरवित आहे. ग्राहकांचे समाधान व हित जोपासण्याला या ग्रुपने प्राधान्य दिले आहे. शहर व शहरालगत आर्च ग्रुपचे वैविध्यपूर्ण व्यावसायिक व निवासी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. ग्राहकांचे समाधान आणि आनंद हीच त्यांच्या यशाची पावती म्हटली तर, ती अतिशोयक्ती ठरणार नाही.
औरंगाबाद शहर व परिसरात आर्च क्रिस्टल, आर्च मनोरथ, आर्च कुसुम आणि आर्च निकुंज या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांच्या यशानंतर 'आर्च डेव्हलपर्स' आता घेऊन आले आहे शेंद्रा कमर्शियल हबमध्ये आर्च समृद्धी, धूत हॉस्पिटलसमोर, सिडको परिसरात आर्च नटराज, क्रांती चौक येथे आर्च दोस्ती, गरवारेसमोर, वाळूजमध्ये आर्च मुरली यांसारखी मनोहारी गृहप्रकल्प.
आपणही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीसाठी इच्छुक असाल तर 'आर्च डेव्हलपर्स'च्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना अवश्य भेट द्या !