gudhi-padwa

शेंद्रा परिसरात घरकुल आणि व्यापार असा दुहेरी लाभ देणारा `आर्च समृद्धी` .!

आगामी काही वर्षात ‘डीएमआयसी` आणि नागपूर-मुंबई महामार्ग या दोन प्रकल्पांनी मराठवाड्यासह औरंगाबादचे स्वरूपच पूर्णतः बदलणार आहे. येत्या काही वर्षात या परिसरात उद्योग-व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा अंदाज औरंगाबादच्या विकास प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रासह औरंगाबाद शहरात औषधी उद्योग, पर्यटन व्यवसाय, सीड्स, ब्रेव्हरीज, स्टील आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला भरपूर संधी आहेत. येत्या काही वर्षात डीएमआयसी प्रकल्पामुळे हा परिसर मेगा इंडस्ट्रीअल बेल्ट होईल, असेही जाणकारांचे मत आहे. सध्या औरंगाबाद शहरात मोठमोठे मॉल्स, बँका, रुग्णालये, शिक्षणसंस्था विस्तारत आहेत. डीएमआयसी, ऑरिक सिटीमुळे (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) शेंद्रा-बिडकीनचे रूप बदलले आहे. देशातील सर्वांत वेगाने प्रगती झालेला हा भाग आहे. त्यामुळे या भागात आपलेही स्वतःचे घर असावे, यासाठी शहरवासीय प्रयत्न करताना दिसतात, पण अनेकदा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

आगामी काळात फायदेशीर ठरेल असे लोकेशन आणि संपूर्ण सोयीसुविधा यांचा विचार करून आर्च ग्रुपने सर्वांगसुंदर 'आर्च समृद्धी' हा निवासी व व्यावसायिक प्रकल्प शेंद्रा परिसरात साकारला आहे. हा परिसर शहरापासून अगदी कमी अंतरावर आणि जालना रोड जवळच असल्याने त्यास उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारा आहे `आर्च समृद्धी` हा निवासी व व्यावसायिक प्रकल्प...! या संकुलात २ बीएचके, १ बीएचके, १ आरके आणि मोठे टेरेस असलेले फ्लॅट्स आहेत. त्याचबरोबर व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स्, शोरूम्स् व ऑफिसेससाठी गाळे आहेत.

`आर्च समृद्धी` या संकुलात काही फ्लॅट्सची रचना अशी केली आहे की, तिथे २०० ते ८०० स्क्वेअर फूट एवढा मोठा एरिया असलेले टेरेस उपलब्ध होते. कुटुंबाच्या सर्वच गरजा पूर्ण करून प्रशस्त जागेचा अनुभव या ठिकाणी घेता येतो. मन प्रसन्न करणाऱ्या रूम्ससह जणू काय मोठा प्लॉटही आपल्याच ताब्यात मिळाला आहे, अशी सुटसुटीत जागा असलेले टेरेस फ्लॅट्सला उपलब्ध करून दिले आहेत. प्राईम लोकेशन, मजबूत बांधकाम, मनमोहक डिझाईन यासह रेसिडेन्सियल आणि कमर्शियल असे दोन्हीही फायदे `आर्च समृद्धी`मध्ये ग्राहकांना मिळतील. एमआयडीसीचा २४ तास पाणीपुरवठा, अखंडित वीजपुरवठा यासह इतर अनेक सुविधा येथे मिळतील.

औरंगाबाद शहराच्या विविध भागांमध्ये आर्च ग्रुपने अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प उभारले आहेत. विश्वासार्हता आणि पारदर्शकता या बळावर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये `आर्च ग्रुप`ने मोठे नाव कमावले आहे. `आर्च ग्रुप`ने आजवर अनेक कुटुंबांचे मनोहारी घराचे स्वप्न साकार केले आहे. शहरातील नागरिकांना स्वतःचे घर खरेदी करणे सोपे व्हावे म्हणून `आर्च ग्रुप`ने शुभारंभाच्या मुहूर्तावर अनेक आकर्षक ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध केल्या आहेत. त्यात 2 BHK फ्लॅट्सवर एकूण किमतीत 2 लाखांची भव्य सूट दिली आहे. `आर्च समृद्धी` प्रकल्पात व्यवसायासाठी शॉप्सची खरेदी केली तर ग्राहकांना त्यावर १ लाख रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर शॉप्सच्या रजिस्ट्री चार्जेसमध्ये १००% सूट मिळणार आहे. `आर्च समृद्धी`मध्ये सर्वांगसुंदर फ्लॅट घेतला तर त्याच्या रजिस्ट्री चार्जेसमध्ये ५०% सूट दिली आहे. यासह सर्वच ग्राहकांना घराच्या खरेदीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.६५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकेल. सर्वच फ्लॅट्स आणि शॉप्सच्या खरेदीसाठी अल्प व्याजदरात कर्ज मिळू शकते. बँक कर्जाच्या सुलभ हप्त्यांच्या माध्यमातून आता तुम्हीही घेऊ शकता स्वतःच्या मालकीचे घरकुल. ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ फक्त २२ ते २४ ऑक्टोबर २०२१ या काळात फ्लॅट्स किंवा शॉप्सची बुकिंग केली तरच घेता येईल. तेव्हा आता प्रतीक्षा न करता, आजच `आर्च समृद्धी`ला भेट देऊन फ्लॅट्स किंवा शॉप्सची बुकिंग करा. यंदाच्या दीपावलीच्या मुहूर्तावर साकार करा आपले घराचे व व्यवसायाचे सुंदर स्वप्न...!