gudhi-padwa

तुमचे स्वप्नमयी घरकुल साकारतील गणपती बाप्पा...!

सुखकारक मंगलदायक श्रीगणेशाचे थाटात स्वागत करण्यासाठी वेगवेगळे बेत आखले जात असतानाच, बाजारपेठही नव्याने सज्ज झाल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. बुद्धिदाता, कौशल्यदाता गणपती बाप्पाला `विघ्नहर्ता` असेही म्हणतात. कोरोनाच्या महाभयानक संकटातून आता आपण सर्वच जण सावरत आहोत. लसीच्या माध्यमातून एकप्रकारचे संरक्षक कवच त्या विघ्नहर्त्यानेच आपल्यासाठी पाठवले आहे, असे आपण म्हणूयात आणि यापुढेही काळजी घेऊयात. श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली की सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. जीवनात संकटांना न घाबरता पुढे जाण्याचे बळ आपणांस गणराय प्रदान करतात. आपल्या आराध्य दैवताचे लवकरच आगमन होणार आहे. नागरिकांचा उत्साह अजूनही तसाच आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वच जण गणरायाच्या आगमनासाठी घराची सजावट करण्यात गुंतले आहेत. /p>

गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा सणासुदीच्या दिवसांचा कालावधी स्थावर मालमत्ता, घर, प्लॉट, रो-हाऊस खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. या उत्सवाच्या काळात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यातच बांधकाम व्यावसायिक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सही विविध सवलतींचे पॅकेज देऊन ग्राहकांच्या स्वागतासाठी तयार आहेत. बांधकाम उद्योगाच्या अंदाजानुसार, जवळजवळ एक तृतीयांश घरांची विक्री या काळात होते, असे मानले जाते.

गेल्या एक-दोन वर्षांपासून बाजारात आलेली मरगळ लक्षात घेता, गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा सणांचा हंगाम बाजारपेठेत नवा उत्साह आणू शकतो. त्यातून रिअल इस्टेट व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त होऊ शकते. गृहनिर्माण क्षेत्रात वरचेवर होणारे बदल ग्राहकांसाठी अनुकूल आहेत. घर खरेदी करणाऱ्यांची इच्छा यंदाच्या वर्षी नक्कीच पूर्ण होऊ शकते. गेल्या दोन वर्षात बँकांचे गृहकर्ज व्याजदरही बरेच खाली आले आहेत. त्याचा फायदा घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारा कालावधी सुवर्णसंधी ठरेल.

सणासुदीच्या काळात रिअल इस्टेट व्यवसायाला तेजी येते. त्याला कारणीभूत ठरते ग्राहकांची मानसिकता. सणासुदीच्या दिवसात घर घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना वेग मिळतो. त्याचे बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम दिसू लागतात. घर खरेदीदारांच्या भावनेला स्पर्श करणारा हाच तो काळ असल्याने रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी येते. सणासुदीला मालमत्ता खरेदी करण्यासाठी मोठ्या संधी मिळतात. बांधकाम व्यावसायिक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बँका आणि वित्तीय संस्थांकडून खरेदीदारांसाठी अनेक ऑफर आणि कर्ज योजना जाहीर केल्या जातात. त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खरेदीदारांसाठी विविध पर्याय खुले होतात.

औरंगाबाद शहरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आर्च ग्रुपने विविध आकर्षक आणि नयनरम्य गृहप्रकल्प उभारले आहेत. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या भागात निसर्गरम्य परिसरातील प्रशस्त फ्लॅट्स, रो-हाउसेस खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना प्राप्त झाली आहे. भविष्यकाळात मोठा परतावा देणारे प्लॉट्स, एनए-४४ लेआऊट असलेले प्लॉट्स अशी खूप मोठी रेंज आर्च ग्रुपने गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध केली आहे.

खरे तर आता शोधाशोध करण्याची वेळ संपली आहे. निर्णय घेण्याची हीच खरी वेळ आहे ग्राहकांसाठी. आजच आर्च ग्रुपच्या विविध गृहप्रकल्पांना भेट देऊन अनुभव घ्या एका नितांत सुंदर जीवनशैलीचा. तुमच्या स्वप्नातले घरकुल आता प्रतीक्षा करीत आहे तुमच्या परिवाराची. चला, तर मग, वेगाने पाऊले उचला... `विघ्नहर्ता` गणपती बाप्पा आहेतच आपल्या पाठीशी...!